महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ODI Cricket History : आजच्या दिवशी भारताने खेळला होता पहिला एकदिवसीय सामना, पहा तेव्हाचा निकाल - The then bowler Eknath Solankar

1974 साली या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय सामना खेळला ( On This Day in Cricket History ) होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक होता.

ODI Cricket History
ODI Cricket History

By

Published : Jul 13, 2022, 6:22 PM IST

हैदराबाद: भारतीय क्रिकेट संघाने 48 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 1974 साली इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना ( Today 48 year ago IND ) खेळला होता. दोन्ही संघांमधील सामना 55 षटकांचा होता, ज्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 265 धावा केल्या होत्या. परंतु इंग्लंडने हा सामना चार विकेट्सने जिंकला होता.

काल म्हणजेच 12 जुलै 2022 रोजी भारताने इंग्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण याच्या एका दिवसानंतर म्हणजे 13 जुलै 1974 मध्ये (India first ODI 13 July 1974 ) या दिवशी टीम इंडियाने पहिला वनडे सामना इंग्लंडविरुद्धच खेळला. काल खेळल्या गेलेल्या सामन्यातही तशीच परिस्थिती या सामन्यातही होती. पण परिणाम पूर्णपणे उलट होते.

भारताचा झाला होता पराभव -

अजित वाडेकर त्यांच्या संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कर्णधार होते.

खरं तर, आजच्याच दिवशी बरोबर 48 वर्षांपूर्वी भारताचा इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत पराभव ( India's first ODI defeat 48 years ago ) झाला होता. या सामन्यात इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ज्यामध्ये भारताचा चार विकेट्सने पराभव झाला होता. ज्यामुळे भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली, पण काळाचे चक्र असे फिरले की त्याच भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या 48 व्या वर्धापनदिनापूर्वी फक्त एक दिवस आधी, इंग्लंडला हाच धडा या फॉरमॅटच्या सलामीच्या सामन्यात मिळाला.

भारताने केल्या होत्या 265 धावा -

इंग्लंडने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर टीम इंडियाने निर्धारित 55 षटकांच्या सामन्यात 265 धावा केल्या. त्यादरम्यान ब्रिजेश पटेलने टीम इंडियासाठी 78 चेंडूत सर्वाधिक 82 धावांची खेळी खेळली, ज्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. ब्रिजेशशिवाय कर्णधार अजित वाडेकर ( The then captain Ajit Wadekar ) हा दुसरा सर्वोत्तम धावा करणारा ठरला. त्याने संघासाठी 82 चेंडूत 10 चौकारांसह 67 धावा केल्या.

त्याचवेळी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्करने ( Opener Sunil Gavaskar ) 28 धावांचे योगदान दिले. तर यष्टिरक्षक फलंदाज फारुख इंजिनियरने 32 धावा केल्या. या दोघांशिवाय सुधीर नाईकने 18 धावा आणि सय्यद आबिद अली 17 धावा करत दुहेरी आकडा गाठणारा फलंदाज ठरला. याशिवाय गुंडप्पा विश्वनाथने चार, एकनाथ सोलकरने तीन, मदन लालने दोन आणि श्रीनिवास व्यंकटराघवनने एका धावांचे योगदान दिले होते.

गोलंदाजीत भारताचा होता कहर -

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना 265 धावा केल्या होत्या. यानंतर गोलंदाजांसमोर आव्हान होते, त्यांनी त्याचा बचाव करायचा होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाला विजयाची नोंद करता आली नाही. मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी यजमान इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. या सामन्यात एकनाथ सोलकरने ( The then bowler Eknath Solankar ) 11 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 31 धावा देत दोन बळी घेतले. त्यादरम्यान त्याने ओव्हर मेडनही टाकली. त्याचवेळी बिशन बेदीनेही 11 षटकांत 68 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय मदन लाल आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

इंग्लंडची फलंदाजी मजबूत -

भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडसमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अनुभवी संघ इंग्लंडसमोर हा काही क्षुल्लक टार्गेट नव्हतो. त्यामुळे यजमानांना हे लक्ष्य गाठण्यासाठी 51.1 षटके लागली. त्यादरम्यान त्यानी सहा विकेट्सही गमावल्या. इंग्लंडकडून जॉन एडरिचने 91 धावा केल्या. याशिवाय टोनी ग्रेगने 40, तर किथ फ्लेचरने 39 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी डेनिस एमिसने 20 आणि डेव्हिड लॉयडने 34 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार माईक डेनिसला केवळ आठ धावा करता आल्या. याशिवाय अॅलन नॉट 15 आणि ख्रिस ओल्डने पाच धावांचे योगदान दिले होते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड, हेड टू हेड -

1974 मध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 104 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने इंग्लंडवर वर्चस्व गाजवत 56 सामने जिंकले ( India won 56 ODIs against England ) आहेत. तर इंग्लंडच्या संघाला केवळ 43 सामन्यांत यश मिळाले आहे. त्याचवेळी दोन सामने बरोबरीत सुटले. तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. अशा रीतीने अर्थातच भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने ( India lost to England in first ODI ) जरी पदार्पण केले असले, तरी त्यानंतर भारताने या संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

भारतीय संघ 1974 साली

पहिल्या वनडेत भारताकडून खेळलेले खेळाडू: सुनील गावस्कर, सुधीर नाईक, अजित वाडेकर (कर्णधार), गुंडप्पा विश्वनाथ, फारूक इंजिनियर (डब्ल्यूके), ब्रिजेश पटेल, एकनाथ सोलंकर, सय्यद आबिद अली, मदन लाल, श्रीनिवास वेंकटराघवन आणि बिशन सिंग बेदी.

हेही वाचा -Captain Rohit Sharma : रोहित शर्माने सिद्ध केले, टीम इंडियाला त्याची किती गरज

ABOUT THE AUTHOR

...view details