महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता - चंचल भट्टाचार्य - महेंद्रसिंग धोनीचे माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य

Cricket World Cup 2023 : महेंद्रसिंह धोनीचे माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता आहे, संघातील सर्व खेळाडू उत्तम असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 6:26 PM IST

चंचल भट्टाचार्य यांची प्रतिक्रिया

रांची (झारखंड) Cricket World Cup 2023 : 2023 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये आयोजित केला जात आहे. याबाबत महेंद्रसिंह धोनीची प्रतिभा ओळखणाऱ्या चंचल भट्टाचार्य यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. भारतीय संघ 2011 च्या विश्वचषकादरम्यान जसा होता त्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. यावर चंचल भट्टाचार्य यांनी संपूर्ण संघाबाबत भाष्य केलंय.

रोहित शर्मात विश्वचषक जिंकण्याची क्षमता :यावेळी बोलताना चंचल भट्टाचार्य म्हणाले की, रोहित शर्माच्या 'मेन इन ब्लू'मध्ये विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे. ज्याचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रोहित हा शांत खेळाडू आहे. तो भारतीय संघाला योग्य मार्गदर्शन करेल तसंच विश्वचषक जिंकण्यासाठी संघ तो पुढे घेऊन जाईल असं भट्टाचार्या यांनी म्हटलं आहे.

विरोधक संघ काय करणार आहे याचा आगोदरच विचार करण्याचं कौशल्य महेंद्रसिंह धोनीकडं होतं. विराट कोहलीकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. तसंच शुभमन गिल नक्कीच संघासाठी काहीतरी मोठं करेल असा विश्वास लोकांना आहे. - चंचल भट्टाचार्य

1983 प्रथमच विश्वचषक जिंकला :कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1983 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला, हे क्रिकेट प्रेमींना माहीत आहे. त्या विजयाची पुनरावृत्ती होण्यासाठी 28 वर्षे लागली. महेंद्रसिंह धोनीनं 2011 साली भारताचं स्वप्न 2 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पूर्ण केलं. चंचल भट्टाचार्य यांनी 1995 ते 2004 या काळात धोनीला मार्गदर्शन केलं होतं.

संघात उत्कृष्ट खेळाडू :भारतीय संघ अतिशय संतुलित आहे. अनेक उत्कृष्ट खेळाडू संघात आहेत. विराट कोहलीनं अशीच कामगिरी केल्यास भारत नक्कीच विजयी होईल. त्याच्यासोबतच शुभमन गिल हा देखील चांगला खेळाडू आहे. ज्यांच्याकडून आम्हाला खूप आशा अपेक्षा असल्याचं भट्टाचार्य म्हणाले.

8 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : धोनीकडे असलेल्या गुणांबद्दल माहिती देताना भट्टाचार्य म्हणाले, "धोनीची शिस्त, त्याचं खेळण्याचं गांभीर्य यामुळं त्याला क्रिकेटमध्ये उच्च शिखरापर्यंत पोहचता आलं. पावसाळ्यात जेव्हा सराव करणं कठीण होतं, तेव्हा धोनी एकतर दिल्ली किंवा इतर ठिकाणी जाऊन सराव करत होता." भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यामुळं या सर्वांकडं क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनला संघात कशी मिळाली संधी?
  2. Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात
  3. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे

ABOUT THE AUTHOR

...view details