महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

NZ vs AUS : स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दिला क्लीन स्वीप, तर कर्णधार फिंचला विजयी निरोप

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील ( NZ vs AUS ODI Series ) शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने किवी संघाचा 25 धावांनी पराभव केला.

NZ vs AUS
NZ vs AUS

By

Published : Sep 12, 2022, 12:17 PM IST

केर्न्स: रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पार ( NZ vs AUS 3rd ODI ) पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा 25 धावांनी पराभव ( New Zealand lost to Australia by 25 runs ) केला. त्याचबरोबर कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला विजयासह निरोप दिला.

स्मिथने ( Steve Smith's century ) 131 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 105 धावा केल्या. त्याने मार्नस लॅबुशेन (52) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करून संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. स्मिथने अ‍ॅलेक्स कॅरी ( Alex Carey 42 not out ) सोबत 69 धावांची भागीदारीही केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्स गमावून 267 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

न्यूझीलंडचा संघ 49.5 षटकांत 242 धावांवर आटोपला -

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 49.5 षटकांत 242 धावांवर आटोपला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. फिंचने आधीच जाहीर केले होते की, हा त्याचा शेवटचा एकदिवसीय असेल आणि त्यानंतर तो या फॉरमॅटमधून निवृत्त ( Aaron Finch retired from ODI cricket ) होईल. मात्र, तो टी-20 मध्ये कर्णधारपदी कायम राहणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सहभागी होणार आहे.

न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यांच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 47 धावा केल्या. खालच्या क्रमवारीत जेम्स नीशमने 36 आणि मिचेल सँटनरने 30 धावांचे योगदान दिले. परंतु यामुळे न्यूझीलंडच्या पराभवाचे अंतर कमी झाले. आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये फिन ऍलन (35), डेव्हॉन कॉनवे (21) आणि कर्णधार केन विल्यमसन (27) यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने तीन ( Mitchell Starc took three wickets ) तर कॅमेरॉन ग्रीन आणि सीन अ‍ॅबॉटने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

फिंचचा खराब फॉर्म कायम -

याआधी फिंचला त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकता आली ( Aaron Finch lost the toss ) नाही आणि त्यानंतरही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. त्यामुळे या सामन्यापूर्वी त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याला वेगवान गोलंदाज टीम साऊदी (57 धावांत 1 बळी) याने 5 धावांवर बाद केले, पण त्याआधी ट्रेंट बोल्टने (25 धावांत 2 बळी) जोश इंग्लिसच्या (10) रूपाने न्यूझीलंडला पहिली विकेट मिळवून दिली.

स्मिथचे एकदिवसीय क्रिकेटमधील 12वे शतक -

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका वेळी दोन बाद 16 अशी होती. स्मिथ आणि लॅबुशेनने येथून जबाबदारी स्वीकारली आणि शतकी भागीदारी केली. लॉकी फर्ग्युसनने लॅबुशेनला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर सँटनरच्या गोलंदाजीवर स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधील 12वे शतक ( Steve Smith 12th century in ODI cricket ) पूर्ण केले. गेल्या दोन वर्षांतील त्याचे या फॉरमॅटमधील हे पहिले शतक आहे. ग्लेन मॅक्सवेलने 8 चेंडूत 14 आणि कॅमेरून ग्रीनने 12 चेंडूत नाबाद 25 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा -Asia Cup 2022 : आशिया चषक श्रीलंकेच्या नावावर.. पाकिस्तानला चारली धूळ, २३ धावांनी केला पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details