साउथम्पटन- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला १८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरोधात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. परंतु, भारतीय संघ मानसिकरित्या अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितलं.
रहाणे म्हणाला की, न्यूझीलंडचा संघ चांगला संघ आहे. आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. न्यूझीलंडने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळली आहेत. याचा त्यांना फायदा होईल. पण अंतिम सामन्यात जो संघ पाच दिवस चांगली कामगिरी करेल, त्याची विजयाची शक्यता जास्त राहिलं.