महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

No Ball Controversy : 'नोबॉल' प्रकरण नडले; दिल्ली संघातील 'या' तिघांवर आयपीएलकडून कारवाई - नोबॉल प्रकरण शार्दुल ठाकूर कारवाई

आयपीएलमधील 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नोबॉल मुळे मोठा वाद निर्माण झाला. त्याप्रकरणी दिल्ली संघातील तिघांवर कारवाई करण्यात आली ( No Ball Controversy ) आहे.

No Ball Controversy
No Ball Controversy

By

Published : Apr 23, 2022, 6:35 PM IST

मुंबई -आयपीएलमधील 34 ( IPL 2022 ) वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा 15 धावांना धुव्वा उडवला. मात्र, या सामन्यात खेळापेक्षा जास्त चर्चा रंगली अखेरच्या षटकात टाकण्यात आलेल्या नोबॉल मुळे. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. याप्रकरणीच आता दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत, गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यावर कारवाई करण्यात आली ( No Ball Controversy ) आहे. याबाबत आयपीएलने एक परिपत्रक जारी केले आहे.

आयपीएलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant ) आयपीएलमधील आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कलम 2.8 अंतर्गत सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शार्दूल ठाकूरवर ( Shardul Thakur ) आयपीएल आचारसंहिता कलम 2.8 अंतर्गत सामना शुक्लाच्या 50 टक्के दंड आकरण्यात आला आहे. तर, प्रशिक्षक प्रविण आमरेंवर आचारसंहिता कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 2 चा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सामना शुल्काच्या 100 टक्के दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली ( Pravin Amre Suspended for A Match ) आहे. या सर्वांनी आपल्यावरील कारवाई मान्य केली आहे.

काय आहे प्रकरण? -शुक्रवारी पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने दिल्लीसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात दिल्लीला 36 धावांची गरज होती. मैदानात उपस्थित असणारा दिल्लीचा फलंदाज रोव्हमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारले. त्यामुळे दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फुलटॉस टाकला. हा चेंडू नोबॉल देण्याची मागणी दिल्ली संघाकडून करण्यात आली.

मात्र, पंचांनी नोबॉल दिला नाही. पंचाच्या निर्णयावर कर्णधार रिषभ पंत भडकला आणि त्याने फलंदाजांना मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याला शार्दूल ठाकूरने साथ दिली. यावेळी, प्रशिक्षक प्रविण आमरे मैदानात गेले. त्यांनी पंचांशी चर्चा केली. त्यानंतर उर्वरित सामन्याला सुरुवात करण्यात आली. मात्र, पॉवेल अखेरच्या चेंडूवर बाद झाला. अन् दिल्ली 15 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा -IPL 2022 Updates : चहल एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडू शकतो - ग्रॅम स्मिथ

ABOUT THE AUTHOR

...view details