महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC Final : फायनलपूर्वीच न्यूझीलंड खेळाडूंची जंगी पार्टी, पाहा व्हिडिओ - ICC WTC Final

इंग्लंडच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे २० खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले होते. आता न्यूझीलंडने अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे. राहिलेले ५ खेळाडू न्यूझीलंडला परत जाणार आहेत. त्यामुळे त्या ५ खेळाडूंना फेअरवेल म्हणून पार्टी आयोजित करण्यात आली होती.

new-zealand-team-doing-party-before-playing-icc-wtc-final-vs-india-in-southampton-ground
WTC Final : फायनलपूर्वीच न्यूझीलंड संघांची जंगी पार्टी, पाहा व्हिडिओ

By

Published : Jun 16, 2021, 6:46 PM IST

Updated : Jun 16, 2021, 7:01 PM IST

साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य या सामन्याकडे आहे. यामुळे सहाजिकच दोन्ही संघातील खेळाडूंवरही तणाव असून याच तणावातून मुक्त होण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू पार्टी करताना पाहायला मिळाले.

न्यूझीलंडने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खेळाडू पार्टी करताना पाहायला मिळाले. ही पार्टी होती फेअरवेलची. इंग्लंडच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे २० खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले होते. आता न्यूझीलंडने अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे. राहिलेले ५ खेळाडू न्यूझीलंडला परत जाणार आहेत. त्यामुळे त्या ५ खेळाडूंना फेअरवेल म्हणून ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

न्यूझीलंडने शेअर केलेल्या व्हिडिओत सर्व खेळाडू मजा करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन सर्व खेळाडू पार्टी करत आहेत. नाच गाण्यासह सुरु असलेल्या पार्टीत सर्वच खेळाडू जोमात दिसत आहेत. पार्टीत मांसाहारी खाण्यासह शाकाहारी जेवणही असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर स्वत: आपल्या सहखेळाडूंना प्रेमाने जेवण वाढताना दिसत आहे.

हेही वाचा -WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित

हेही वाचा -WTC Final मध्ये तुझं काय होणार?, बोल्टने केली रोहितची स्लेजिंग

Last Updated : Jun 16, 2021, 7:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details