महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC FINAL : भारतीय संघाचे टेन्शन वाढलं, जाणून घ्या कारण - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना २०२१

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून या दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

new zealand squad confirmed for ICC World Test Championship Final
WTC FINAL : भारतीय संघाचे टेन्शन वाढलं, जाणून घ्या कारण

By

Published : Jun 15, 2021, 3:53 PM IST

लंडन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून या दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तुफान फलंदाजी केलेल्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिलं आहे. यामुळे भारतीय संघाचं काहीसं टेन्शन वाढलं आहे.

न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध २ सामन्याची कसोटी मालिका खेळली. यात त्यांनी १-० ने विजय मिळवला. या मालिकेत डेव्हॉन कॉनवे याने द्विशतकासह सर्वाधिक ३०६ धावा केल्या. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच न्यूझीलंडने फक्त एकाच फिरकीपटूला स्थान दिले आहे. अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे. तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडने निवडलेला संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.

हेही वाचा -WTC फायनल : विजेत्याला मिळणार तब्बल 'इतकी' रक्कम

हेही वाचा -WTC FINAL : अंतिम सामन्याआधी पुजाराची डरकाळी, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details