साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांनी मंगळवारी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. परंतु, त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघांमध्ये वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळत आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यवस्थापनाने न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विषय असा आहे की, न्यूझीलंडचे सहा खेळाडू हे बायो-बबल नियम मोडून गोल्फ खेळण्यासाठी गेले असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. या सहा खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डॅरील मिचेल व फिजिओ टॉमी सिम्सेक यांचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'संघ व्यवस्थापनाकडून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आयसीसीने दोन्ही संघांसाठी सारखेच नियम तयार करायला हवेत. आयसीसी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा आम्ही मांडला आहे.