किंग्स्टन: कर्णधार केन विल्यम्सच्या 47 आणि जिमी नीशमच्या 15 चेंडूत 33 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पावसाने खोळंबा केलेल्या पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 13 धावांनी पराभव केला (New Zealand beat West Indies). नीशमने शेवटच्या तीन चेंडूत तीन चौकार मारले आणि शेवटच्या षटकात 23 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाच गडी गमावून १८५ धावा केल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने 19 धावांत तीन बळी घेतल्याने न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 7 बाद 172 धावांवर रोखले.
मार्टिन गप्टिल आणि डेव्हन कॉनवे यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 63 धावा केल्या. दोघांनाही ओडियन स्मिथने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 12व्या षटकात पाऊस आला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या दोन गडी बाद 95 अशी होती.
पावसामुळे सुमारे दोन तास खेळ विस्कळीत झाला होता. त्यानंतर पुढील 18 चेंडूत न्यूझीलंडने 33 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शमारा ब्रूक्सने 42 धावा केल्या. निकोलस पूरनने आठ चेंडूंत १५ तर जेसन होल्डरने १९ चेंडूंत २५ धावा केल्या.
हेही वाचा - New Zealand Cricket Board: ट्रेंट बोल्ट निवृत्ती घेण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय आहे कारण