लंडन:नेदरलँड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रायन कॅम्पबेल ( Head Coach Ryan Campbell ) यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात एक वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. शनिवारी आपल्या कुटुंबासह बाहेर जात असताना पन्नास वर्षीय प्रशिक्षकाच्या छातीत अचानक दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
पर्थचे पत्रकार आणि कॅम्पबेल कुटुंबाचे मित्र गॅरेथ पार्कर यांच्या मते, रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार, कॅम्पबेलची प्रकृती रुग्णालयात गंभीर होती. मात्र, त्याने स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न केला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कॅम्पबेल डच टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यातून माघारी जात होते आणि एका आठवड्यापूर्वी पर्थ या त्याच्या मूळ शहरात मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटायला आले होते. 50 वर्षीय वेस्ट ऑस्ट्रेलियनने दोन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.