अहमदाबाद : सध्या अहमदाबाद येथे भारत विरुद्ध वेस्ट (India v West Indies) इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. दीपक चहर, कुलदीप यादव आणि शिखर धवन यांनी संघात पुनरागमन केले आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची घसरगुंडी उडाली आहे. भारताचे सुरुवातीचे तीन फलंदाज स्वस्तात परतले आहेत. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) (13), शिखर धवन (10) आणि विराट कोहली (0) यांचा समावेश आहे. जे तंबूत परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था 10 षटकांत 3 बाद 43 धावा झाली होती.
चोथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी -
त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी खेळपट्टीवर तग धरत तिसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचली. या दोघांनी 30 षटकांच्या संमाप्तीपर्यंत धावफलकावर 152 धावा लावल्या. त्यानंतर रिषभ पंत आपले अर्धशतक (56) पूर्ण करुन (Rishabh Pants half century) बाद झाला. त्याने अय्यर सोबत चोथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सुर्यकुमार यादवने देखील निराशा केली. तो फक्त सहा धावांचे योगदान देऊन माघारी परतला. परंतु श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली आहे. त्याने 104 चेंडूचा सामना करातान 8 चौकारांच्या मदतीने हा 73 धावा करुन खेळत आहे. आता त्याच्या जोडीला वाशिंग्टन सुंदर आहे
वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफने महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये रोहित आणि विराट कोहलीचा समावेश होता. त्याचबरोबर फॅबियन अॅलेन देखील दोन आणि हेडन वाल्श यांनी एक विकेट घेतली आहे.