नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी खुलासा केला आहे की, त्यांना स्टेज 2 कॅन्सर आहे. नवज्योत कौर यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पतीसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू रोड रेज प्रकरणात दोषी ठरल्यानंतर पटियाला सेंट्रल जेलमध्ये एक वर्षाची शिक्षा भोगत आहेत.
सिद्धू यांची पत्नी झाली भावुक :सिद्धूच्या पत्नीने लिहिले की, त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी तो तुरुंगात आहे. यासाठी सर्व दोषी लोकांना माफ करा, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, रोज तुम्ही बाहेर येण्याची वाट पाहणे खूप वेदनादायक आहे. तुमचे दु:ख कमी करण्यासाठी मी हे शेअर करत आहे. तुमची वाट पाहत आहे. मात्र वारंवार आम्हाला न्यायापासून वंचित ठेवले जात आहे.
रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा : त्यांनी लिहिले की कलियुगात सत्य शक्तिशाली आहे, परंतु ते तुमची पुन्हा पुन्हा परीक्षा घेत आहे. क्षमस्व, आता तुमची प्रतीक्षा करू शकत नाही. कारण हा दुसऱ्या स्टेजचा वेगाने पसरणारा कर्करोग आहे. आज शस्त्रक्रिया करायची आहे. कोणाला दोष देत नाही. कदाचित, ही देवाची योजना आहे. एकदम परफेक्ट. गेल्या वर्षी 19 मे रोजी सुप्रीम कोर्टाने माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना तीन दशक जुन्या रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.
सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले :22 सप्टेंबर 1999 रोजी पटियाला सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सिद्धू आणि त्यांच्या साथीदारांना पुराव्याअभावी तसेच या खटल्यातील संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. या निर्णयाला पीडित कुटुंबीयांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. हायकोर्टाने 2006 मध्ये सिद्धूला दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर या निर्णयाविरुद्धच्या आदेशाला सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धूने गुरनाम सिंग यांना कथितपणे मारले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :Miami Open 2023 : पहिल्या फेरीत माजी यूएस ओपन चॅंम्पियन बियान्का अँड्रीस्कूकडून एम्मा रडुकानुचा पराभव