महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'नॅशनल क्रश' रश्मिकाला आवडतो 'हा' क्रिकेटपटू - rashmika mandanna on rcb

रश्मिकाला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आवडतो. तिने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये याची कबुली दिली.

national-crush-rashmika-mandanna-said-her-favourite-player-is-ms-dhoni
'नॅशनल क्रश' रश्मिकाला आवडतो 'हा' क्रिकेटपटू

By

Published : May 17, 2021, 5:44 PM IST

मुंबई - दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडिया यूजर्स आणि तिच्या चाहत्यांमध्ये 'नॅशनल क्रश' म्हणूनच ओळखली जाते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. या दरम्यान, रश्मिकाने आपला आवडता क्रिकेटपटू कोण आहे, याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रश्मिकाने आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आपला आवडता संघ असल्याचे सांगितले होते. यामुळे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा रश्मिकाचा आवडता खेळाडू असेल, असा कयास चाहत्यांचा होता. विराटसोबत रोहित शर्माचे नाव देखील चर्चेत होते. परंतु, तिला ना विराट आवडतो ना रोहित.

रश्मिकाला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आवडतो. तिने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये याची कबुली दिली. तिने म्हटलं की, धोनीची फलंदाजी, नेतृत्व आणि यष्टीरक्षक शानदार आहे. तो एक मास्टर क्लास खेळाडू आहे. धोनी माझा हिरो आहे.

दरम्यान, याआधी तिला एका चाहत्याने विचारल की, तुझा आयपीएलमधील आवडता संघ कोणता आहे. तिने यावर कन्नडमध्ये उत्तर दिलं. म्हणाली, 'ई सला कप नमदे' याचा अर्थ असा होतो की, या वर्षी कप आपलाच. बंगळुरू संघाची या वर्षीची ही टॅगलाईन होती.

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने कन्नड, तमिळ, तेलगु चित्रपटात काम केलं आहे. २०१८ मध्ये तिने 'चलो' या तेलगु चित्रपटातून डेब्यू केला होता. तिने आतापर्यंत १०हून अधिक चित्रपटात काम करत अॅक्टिंगच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

हेही वाचा -वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

हेही वाचा -कारकिर्दीतील १० ते १२ वर्ष तणावात होतो, सचिनचा मोठा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details