मुंबई - भारतीय उपखंडात झालेला सन २०२१ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेलिस याने सांगितले. तब्बल १० वर्षानंतर डू प्लेसिसने याबाबतचा खुलासा केला आहे.
भारतीय उपखंडात आयोजित २०११ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने साखळी फेरीमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडने आफ्रिकेचा पराभव केला आणि आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
आफ्रिकेचे विश्व करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य असलेल्या फाफ डू प्लेसिस याला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. स्वतः प्लेसिसने याबाबत खुलासा केला. मला व माझ्या पत्नीला त्या पराभवानंतर जीवे मारण्याची धमकी एका माथेफिरूने दिली होती, असे डू प्लेसिसने सांगितलं.