मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे. अशात बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
एमएसके प्रसाद यांनी प्रशिक्षकपदासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे. शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची भूमिका 2017 पासून निभावत आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे.
प्रसाद यांनी स्पोर्टस तकशी बोलताना सांगितलं की, मला माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं होतं की, रवी शास्त्री यांच्यानंतर नक्कीच धोनी मेंटॉर म्हणून तर राहुल द्रविड हा प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळतील.