महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Dhoni spotted at US Open : यूएस ओपनमध्ये दिसला धोनी, आयोजकांनी फोटो ट्विट करुन म्हटले भारताचा महान फलंदाज - यूएस ओपन टेनिस न्यूज

शनिवारी यूएस ओपनने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा फोटो ट्विट केला. यामध्ये धोनी स्टेडियममध्ये बसलेला दिसत ( Dhoni spotted at US Open ) आहे.

Dhoni
धोनी

By

Published : Sep 11, 2022, 12:52 PM IST

न्यूयॉर्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former captain Mahendra Singh Dhoni ) सध्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेचा ( US Open Tennis Tournament ) आनंद घेत आहे. 8 सप्टेंबर रोजी आर्थर अॅशे स्टेडियमवर स्पॅनिश युवक कार्लोस अल्कारेझ आणि इटलीचा जॅनिक सिनार यांच्यातील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी धोनी उपस्थित होता. ज्यामुळे तो कॅमेरात कैद ( Dhoni spotted at US Open ) झाला.

शनिवारी यूएस ओपनने भारताचा माजी कर्णधार धोनीचा फोटो ट्विट केला ( US Open tweeted a photo of Dhoni ) आणि लिहिले, "जर तुम्ही बघण्यात चुकला असाल तर, भारतीय फलंदाज एमएस धोनी ( Indian batsman MS Dhoni ) बुधवारी मैदानावर अल्काराज आणि सिनर यांच्यातील विक्रमी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा आनंद घेत आहे." या फोटोत धोनी निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून हसत टाळ्या वाजवताना दिसत आहे.

कार्लोस अल्कारेझचा सामना उपांत्यपूर्व फेरीत जॅनिक सिनरशी ( Quarterfinal match Carlos Alcarez vs Janic Siner ) झाला. पाच तास 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या सामन्यात अल्कारेझने 6-3, 6-7, 6-7, 7-5, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. यूएस ओपनच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा सामना होता. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथनच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्सने अलीकडेच म्हटले आहे की, धोनी आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत राहील. धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाखाली चार आयपीएल जेतेपद पटकावले आहेत.

हेही वाचा -Asia Cup 2022 Final SL vs PAK : आज ठरणार 'आशियाचा क्रिकेट सम्राट' कोण? श्रीलंका-पाकिस्तान संघात होणार महामुकाबला

ABOUT THE AUTHOR

...view details