महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MS Dhoni Reveals : विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनी झाला होता भावूक, जाणून घ्या काय घडले - वनडे विश्व कप 2011

2 एप्रिल 2011 रोजी भारताने श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने हा इतिहास रचला. यापूर्वी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

MS Dhoni Reveals
विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनी झाला होता भावूक

By

Published : Apr 3, 2023, 10:15 AM IST

नवी दिल्ली : माजी कर्णधार एमएस धोनीने 2011 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाचा एक किस्सा शेअर केला आहे. विजयाच्या क्षणाच्या अवघ्या 15-20 मिनिटे आधी लोकांनी 'वंदे मातरम' म्हणायला सुरुवात केली तेव्हा तो 'भावनिक' झाल्याचा खुलासा माहीने केला आहे.

विश्वचषक विजयाचा 12 वा वर्धापन दिन :रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी विश्वचषक विजयाचा 12 वा वर्धापन दिन होता. 28 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत धोनीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनी म्हणाला, संपूर्ण संघ 15-20 मिनिटे आधी (विजय होण्याच्या क्षणापूर्वी) खूप भावनिक झाला होता. आम्हाला जास्त धावांची गरज नव्हती, भागीदारी चांगली चालली होती, खूप दव होते. स्टेडियममध्ये वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. मला वाटते की, अशाप्रकारचा माहोल पुन्हा तयार करणे खूप कठीण आहे, या (आगामी 2023) विश्वचषकातही अशीच परिस्थिती असू शकते.

2011 च्या विश्वचषक विजयाचा दिवस सचिनसाठी महत्वाचा :परत तसाच माहोल बनवणे खूप कठीण आहे, परंतु प्रसंग 2011 सारखा असेल आणि 40, 50 किंवा 60,000 लोक गात असतील तरच त्याची प्रतिकृती बनवता येईल. माही म्हणाला, 'विजयाचा हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. शिवाय, मी त्यासाठी उत्सुक होतो. आम्हाला माहित होते की आम्ही जिंकू आणि आमच्यासाठी हरणे खूप कठीण होते. या विजयावर समाधानी आहे. 2011 च्या विश्वचषक विजयाचा दिवस हा भारतीय क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरसाठी देखील एक महत्त्वाचा प्रसंग होता. सचिन सन्मानाची ट्रॉफी उचलण्यासाठी 20 वर्षांपासून प्रयत्न करत होता. सचिन तेंडुलकरसाठीही विश्वचषक जिंकणे आवश्यक होते, असे धोनीने सांगितले. होय, आम्हा सर्वांना माहित होते की हा पाजीचा (तेंडुलकर) शेवटचा विश्वचषक होता. संपूर्ण स्पर्धेत आम्ही त्याच्यासाठी विश्वचषक जिंकला पाहिजे असे आम्हाला वाटले.

हेही वाचा :World Cup 2023 : आयसीसीने जारी केला विश्वचषक 2023 चा लोगो, ही आहे स्पेशल थीम

ABOUT THE AUTHOR

...view details