नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीग संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाइक्सची खूप आवड आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला धोनीचा व्हिडिओ पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. एमएस धोनीकडे एकापेक्षा एक उत्तम बाइक आहेत. धोनीच्या कलेक्शनमध्ये क्लासिक बाइक्स ते सुपरबाइकचा समावेश आहे. आयपीएल 2023 च्या आगामी हंगामासाठी धोनीने आधीच तयारी सुरू केली आहे. नुकताच याआधीही धोनीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो रांची स्टेडियमवर चौकार आणि षटकार मारताना दिसत होता.
सिंगल सिलेंडरसह लिक्विड कूल्ड इंजिन :एमएस धोनी बाईक चालवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप ट्रेंड करत आहे. धोनी यावेळी आयपीएलच्या मोसमाची तयारी करत आहे. यामुळे धोनीने सरावासाठी बाईकवरून रांची स्टेडियम गाठले. धोनी पाठीवर बॅग लटकवून आणि हेल्मेट घालून बाइक चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या दुचाकीचा रंग लाल आहे. धोनी टीव्हीएस आपाची RR310 चालवत रांची स्टेडियमवर पोहोचला. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. चाहते सतत या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी एजीव्ही हेल्मेट घालून बाइक चालवताना दिसत आहे. धोनीच्या बाईक मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर ते बीएमडब्ल्यू आणि टिव्हीएसने संयुक्तपणे बनवले आहे. ही बाईक सुमारे 313cc आहे. ही बाईक सिंगल सिलेंडरसह लिक्विड कूल्ड इंजिनच्या सुविधेने सुसज्ज आहे. धोनीची ही बाईक त्याच्या इंजिनमुळे इतर बाईकपेक्षा खूप वेगळी आहे. ते केवळ 7.13 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावते.