रांचीःआयपीएल 2022 संपताच, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आपल्या व्यवसायाला नवा आयाम देणार आहे. मुलांना बहुआयामी शिक्षण देण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची विशेष शाळा 1 जूनपासून सुरू होत आहे. 'एमएस धोनी ग्लोबल स्कूल' ( MS Dhoni Global School ) हे माहीच्या या खास शाळेचे नाव आहे.
कर्नाटकातील बंगळुरू येथील एचएसआर साउथ एक्स्टेंशन कुडलू गेटजवळ बांधलेली ही शाळा नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा अवलंब करेल. ज्यामध्ये अभ्यासासोबतच अनेक प्रकारच्या उपक्रमांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी एमएस ग्लोबल स्कूलने मायक्रोसॉफ्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या डान्स विथ माधुरी या संस्थेशी चॅनल पार्टनर म्हणून करार केला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी शाळेचे मार्गदर्शक ( Sakshi Dhoni is the school Mentor ) आहेत, तर आर चंद्रशेखर हे शाळेचे अध्यक्ष आहेत.