मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो काय करणार आहे? याबद्दलची माहिती दिली आहे.
एका माध्यमाशी बोलताना शमी म्हणाला, पाहा, आताच काही योजना आखणे उचित होणार नाही. कारण काही बाबी आपल्या हातात राहत नाहीत. कोणी विचार केला होता का?, कोरोनामुळे आपल्या जीवनातील दोन वर्ष खराब होती. यामुळे मी एका वेळेस एका मालिकेवर किंवा एका स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करत आहे.
आम्ही शानदार खेळ केला आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्याआधी आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, असेही शमीने सांगितलं. आतापर्यंत ५० कसोटी सामन्यात १८० विकेट घेणाऱ्या शमीने पुढे सांगितलं की, जर आम्ही मागील ६ महिन्यातील लय पुन्हा दाखवण्यास यशस्वी ठरलो तर मला पूर्ण विश्वास आहे की, हा दौरा आमच्यासाठी शानदार ठरेल.