पुणे:23 एप्रिल रोजी ब्रेबॉर्न येथे सनरायझर्स हैदराबादने प्रथम आरसीबीला 16.1 षटकात 68 धावांत गुंडाळले. आरसीबीचे शीर्ष फळीतील फलंदाज लवकर बाद झाले आणि मधल्या फळीतील फलंदाज जेव्हा फलंदाजीला आले, तेव्हा त्यांनाही मोठी पारी खेळण्यात अपयश आले. त्यानंतर हैदराबादने 12 षटके शिल्लक असताना नऊ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन ( Director of Cricket Operations Mike Hesson ) यांनी प्रतिक्रिया दिली.
या मोठ्या पराभवावर लक्ष केंद्रित करत माईक हेसन म्हणाला, "आम्ही खेळात उतरण्यासाठी संघर्ष केला. आम्ही धावा धावा करण्यावर जोर देत होतो, पण फटके मारण्यात अपयशी ठरलो. हैदराबादने त्या परिस्थितीत चांगली गोलंदाजी केली. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला." तो पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या तीन विकेट गमावता, तेव्हा तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करता. आम्ही हे यापूर्वीही अनेकदा केले आहे, परंतु एसआरएच ( SRH ) विरुद्ध करू शकलो नाही. आम्ही ज्या काही योजना आखल्या होत्या, त्या कामी आल्या नाहीत."