लंडन: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी आपल्या कसोटी संघाबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गॅरी कर्स्टन सारख्या प्रशिक्षकाला वगळता इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्क्युलमची नियुक्तीवर ( Brendon McCullum Appointed England Test Coach ) शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे यावर माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नियुक्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्क्युलमला इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बनवण्यातही मोठा धोका असल्याचे त्याने म्हटले आहे.
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलमची ( Cricketer Brendon McCullum ) इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 40 वर्षीय माजी खेळाडूचा कार्यकाळ इंग्लंडसोबत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सुरू होईल. वर्क व्हिसा मिळाल्यानंतर तो 2 जूनपासून टीममध्ये सामील होऊ शकतो. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये केकेआरचा प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.
गॅरी कर्स्टनची प्रशिक्षकपदी नियुक्ती न केल्याबद्दल मायकेल वॉनने व्यक्त केले आश्चर्य-
द टेलिग्राफच्या स्तंभात, मायकेल वॉन यांनी गॅरी कर्स्टन प्रशिक्षक म्हणून नियुक्त न केल्याने निराशा व्यक्त केली. तो म्हणाला की मॅक्क्युलम हा चांगला प्रशिक्षक आहे, पण खूप जोखमीचा पर्याय आहे. वॉनने लिहिले, गॅरी कर्स्टनसारख्या प्रशिक्षकाकडे इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा दुर्लक्ष केले आहे. मला हे फार विचित्र वाटते. त्याला एकदा नव्हे तर दोनदा प्रशिक्षक न करण्याचा निर्णय कसा घेतला हे मला समजत नाही. तो एक उत्तम मार्गदर्शक, विचारवंत आणि क्लच ड्रायव्हर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम हे मोठे नाव आहे पण त्याला प्रशिक्षक करणे सुरक्षित नाही.
याआधी अशा बातम्या आल्या होत्या की, इंग्लंड कसोटी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन ( Former cricketer Gary Kirsten ) यांची नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र, नंतर ब्रेंडन मॅक्क्युलमची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले, "ब्रेंडन मॅक्क्युलमची इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.
हेही वाचा -Umran Malik father Statement : आगामी काळात माझा मुलगा भारताकडून खेळेल - उमरान मलिकच्या वडिलांचे वक्तव्य