चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सर्वांत लांब षटकार केरॉन पोलार्डने ठोकला. त्याने शनिवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. पोलार्डच्या आधी या हंगामात सर्वात लांब षटकार ग्लेन मॅक्सवेलने ठोकला होता.
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने संघ अडचणीत असताना चांगली खेळी केली. त्याने २२ चेंडूत ३५ धावा काढल्या. डावाच्या १७व्या षटकामध्ये मुजीब रहमानच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने सगळ्यात लांब षटकार खेचला. या षटकाराची लांबी १०५ मीटर होती. आयपीएल २०२१ च्या मोसमातील हा सर्वांत लांब षटकार ठरला. पोलार्डच्या १०५ मीटर षटकाराअगोदर या हंगामातील लांब षटकार मारण्याचा विक्रम बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने मुंबईविरुद्धच १०० मीटरचा षटकार खेचला होता.