महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MI vs DC Match WPL : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव - मुंबई इंडियन्स

महिला प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचला असून, त्याने मुंबई इंडियन्सला पहिल्या स्थानावरून बाहेर फेकले आहे.

MI vs DC Match WPL
आज मुंबई इंडियन्स भिडणार दिल्ली कॅपिटल्सशी

By

Published : Mar 20, 2023, 1:11 PM IST

Updated : Mar 20, 2023, 10:52 PM IST

मुंबई : महिला प्रीमियर लीगमधील अव्वल दोन संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला आहे. यामध्ये, दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 109 धावाच करू शकला. दिल्लीने नऊ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 110 धावा करून सामना जिंकला आहे.

गुजरात आठ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर :पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनेही आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने चार जिंकले आहेत तर दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 मार्च रोजी मेगच्या संघाला गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. गुजरातने दिल्लीचा 11 धावांनी पराभव केला. गुजरात आठ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेली मॅथ्यूज उत्कृष्ट फॉर्ममध्ये :हरमनप्रीत कौर आणि हेली मॅथ्यूज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. हरमनने गेल्या सहा सामन्यात 205 धावा केल्या आहेत. हेलीनेही वेगवान फलंदाजी करताना 203 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीच्या कर्णधाराने सहा सामन्यांत 239 धावा केल्या आहेत. शेफाली वर्मानेही 187 धावा केल्या आहेत. मुंबईचा गोलंदाज सायका इशाक दिल्लीसाठी धोका ठरू शकतो. सायकाने सहा सामन्यांत 12 विकेट घेतल्या आहेत.

  • मुंबई इंडियन्स संभाव्य संघ : 1 हेली मॅथ्यूज, 2 यास्तिका भाटिया (विकेटकीपर), 3 नाट सायव्हर ब्रंट, 4 हरमनप्रीत कौर (क), 5 अमेलिया केर, 6 इस्सी वाँग/क्लो ट्रायटन, 7 अमनजोत कौर, 8 हुमैरा काझी, 9 धारा गुर्जा , 10 जिंतीमणी कलिता, 11 सायका इशाक.
  • दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ : 1 मेग लॅनिंग (कर्णधार), 2 शफाली वर्मा, 3 जेमिमाह रॉड्रिग्ज, 4 मारिजन कॅप, 5 एलिस कॅप्सी/लॉरा हॅरिस, 6 जेस जोनासेन, 7 अरुंधती रेड्डी/जसिया अख्तर, 8 तान्या भाटिया (विकेटकीपर), 9 राधा यादव, 10 शिखा पांडे, 11 पूनम यादव/तारा नॉरिस.

हेही वाचा :Ind Vs Aus Second ODI : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव; 117 धावातच गुंडाळले, 4 फलंदाज शून्यावर बाद

Last Updated : Mar 20, 2023, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details