नवी दिल्लीमुंबई इंडियन्सने अलीकडेच दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 UAE T20 League लीगसाठी त्यांच्या संघांची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील एमआय केपटाऊन आणि यूएईमधील एमआय एमिरेट्स Mumbai Indians Emirates हे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे संघ असतील. मुंबई इंडियन्सच्या एमआय एमिरेट्सने यूएई टी-20 लीगसाठी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डसह All-rounder Kieron Pollard अनेक खेळाडूंना करारबद्ध केले आहे.
मुंबई इंडियन्स एमिरेट्स संघासोबत 14 खेळाडू करारबद्ध
याबाबतची माहिती मुंबई इंडियन्स एमिरेट्सने शुक्रवारी दिली. संघाने नुकतेच एकूण 14 खेळाडू Mumbai Indians Emirates 14 players signed जोडले आहेत, ज्यामध्ये चार खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. तर तीन इंग्लंड, तीन अफगाणिस्तान, एक स्कॉटलंड, एक नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.