नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड संघात एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला 1 जुलैला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सलामीवीर मयंक अग्रवालचा कर्णधार रोहित शर्माचा कव्हर म्हणून इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला ( Mayank Agarwal join Indian Test team ) आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने रोहित शर्मा या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
रोहित पहिल्या दिवशी लीसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सराव सामन्यात खेळला पण तेव्हापासून तो क्वॉरंटाइन आहे. कारण रॅपिड अँटीजेन चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह ( Rohit Sharma Corona Positive ) आला होता. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटीत 15 जणांच्या संघात मयंकचा समावेश नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी केएल राहुल जखमी झाला होता आणि आता रोहितला कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्याला मिळाली आहे.