मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा या स्पर्धेत 8 नव्हे तर 10 संघाचा सहभाग आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या सामन्यांची संख्या देखील वाढली आहे. या पंधराव्या हंगामातील सामन्यांची संख्या 74 आहे. तसेच या हंगामात प्रत्येक संघ एकमेकापेक्षा वरचढ आहे. त्यामुळे आयपीएल 2022 चे विजेतेपद कोण पटकावेल हे सांगणे अवघड आहे. त्यातच आता चार वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ( IPL champions Chennai Super Kings ) नेतृत्वात बदल होऊनही आयपीएल 2022 चे विजेतेपद टिकवून ठेवण्यास सक्षम आहे, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी ( Matthew Hayden Statement ) व्यक्त केला आहे.
दरम्यान, सीएसकेला या मोसमातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders )विरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता, ज्यामध्ये त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही त्यांना हवी तशी कामगिरी करू शकली नव्हती.पण रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी लखनौ सुपरजायंटशी सामना करताना ब्रेबॉर्न स्टेडियमवर आपले पहिले दोन गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल.