गॅले: अनुभवी अँजेलो मॅथ्यूज रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात 100 कसोटी सामने खेळणारा श्रीलंकेचा सहावा क्रिकेटपटू ( Angelo Mathews SL sixth cricketer ) ठरला. या प्रसंगी 35 वर्षीय खेळाडूला गोलंदाजी प्रशिक्षक चामिंडा वास यांच्याकडून विशेष कॅप देण्यात ( special cap from bowling coach to Mathews ) आली. विशेष म्हणजे मॅथ्यूज आणि वास हे दोघे एकाच शाळेत शिकलेत. तसेच वासनंतर मॅथ्यूजने 100 कसोटी सामने पूर्ण केले आहेत. श्रीलंका क्रिकेटने छायाचित्रांसह ट्विट केले, अँजेलो मॅथ्यूजला त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी ( Angelo Mathews played 100 Tests ) विशेष कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
मॅथ्यूजपूर्वी श्रीलंकेचे पाच खेळाडू ( Six SL players play 100 Tests ) महेला जयवर्धने (149 सामने), कुमार संगकारा (134), मुथय्या मुरलीधरन (133), चामिंडा वास (111), सनथ जयसूर्या (110) यांनी देशासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. 2009 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या आणि 7,000 कसोटी धावांच्या मार्गावर असलेल्या मॅथ्यूजला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये 10,000 धावा करायच्या आहेत. मॅथ्यूज म्हणाला, कसोटीत 10 हजार धावा करणे खूप छान होईल. खूप लोकांनी हे केले नाही आणि मला ते साध्य करायचे आहे.