मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील (IPL Fifteenth season ) सातवा सामना गुरुवारी बेब्रॉन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामन लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( CSK vs LSG ) संघात खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांचा सामना करणार आहेत. कारण लखनौ संघ यंदा नव्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झाला आहे. दोन्ही संघाचा हा सामना स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघाना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स 29/4 वर झुंजताना, बदोनी (54) यांनी दीपक हुडा (55) सोबत 87 धावांची चांगली भागीदारी करून लखनौला 20 षटकात 158/6 अशी सन्माननीय धावसंख्या गाठण्यास मदत केली. भारताचा उपकर्णधार केएल राहुलच्या ( India vice-captain KL Rahul ) नेतृत्वाखालील संघाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला असला, तरी वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यातून काही सकारात्मक गोष्टी दिसून आल्या. ज्यामध्ये बदोनी आणि हुडाची फलंदाजी आणि दुष्मंथा चमीराची गोलंदाजीचा समावेश आहे. यात सर्वात मोठा फायदा म्हणजे बदोनीची फलंदाजी, त्याने आपली खेळी उभारताना परिपक्वता काय असते, हे दाखवून दिले.
लखनौ सुपर जायंट्सप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) देखील त्यांचा पहिला सामना गमावला आहे. गुरुवारी येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आपले पहिले गुण मिळविण्याची आशा करेल. सीएसकेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. ज्यामध्ये त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांना हवी तशी कामगिरी करू शकली नाही. वानखेडेवरील सामन्यात दव जास्त असल्याने दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणे अत्यंत कठीण आहे.