पुणे:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master blaster Sachin Tendulkar ) काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरने आवर्जून पुण्यातील डेक्कन जिमखान्यामधील पीव्हायसी मैदानाची पाहणी केली होती. त्यानंतर आता सचिन तेंडुलकरने तो व्हिडिओ शेअर करत म्हणाला, माझ्या अनेक जुन्या आठवणींनी उजााळा मिळला आहे.
पीव्हायसी मैदानासोबतच्या जुन्या आठवणी आणि माहिती देतानाचा एक व्हिडिओ सचिन तेंडुलकरने शेअर केलेला ( Sachin Tendulkar shared a video ) आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे अचानक सचिन पुण्यात आगमन झाले होते. परंतु ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांना माहित झाले. सचिनने शेअर केलेलल्या व्हिडिओत, तो पीव्हायसी मैदानासोबत त्याचे असलेल्या जुन्या आठवणी सांगत ( Sachin Tendulkar PVC Ground Video )आहे.