महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : 'तस्कीन अहमदला आयपीएलमध्ये सहभागी न झाल्याबद्दल बक्षीस द्यावे' - IPL 2022 News

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) या स्पर्धेला एक दिवसापूर्वी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू धडपडत असतो. या स्पर्धेबद्दल आता बांगलादेशच्या खेळाडूने एक वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, तस्कीन अहमदला आयपीएलमध्ये सहभागी न झाल्याबद्दल बक्षीस दिले जावे.

Taskin Ahmed
Taskin Ahmed

By

Published : Mar 27, 2022, 10:58 PM IST

हैदराबाद:आयपीएलच्या पंधराव्या ( Fifteenth season of IPL ) हंगामाला शनिवारी सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात टी-20 लीग म्हणून आयपीएलला ओळखले जाते. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. परंतु या स्पर्धेत काही थोड्याच लोकांचे सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण होते. मात्र, आता या स्पर्धेबद्दल बांगलादेशच्या मशरफे मोर्तजाने एक अजब वक्तव्य ( Mashrafe Mortazs statement ) केले आहे. त्याच्या मते, तस्कीन अहमदला आयपीएलमध्ये सहभागी न झाल्याबद्दल त्याला बक्षीस देण्याची मागणी केली आहे.

तस्कीन अहमदला लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) सहभागी करुन घेणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु होती. परंतु तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघासोबतच राहिला. लखनौ सुपर जायंट्सने मार्क वूडचा बदली खेळाडू म्हणून तस्कीन अहमदला ( Taskin Ahmed ) घेण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी संपर्क केला होता. त्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या मध्यावर बीसीबीने तस्किनला ना-हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौ संघाने अँड्रू टायचा संघात समावेश केला.

मशरफे मोर्तजाने तस्कीन अहमदच्या ( Mashrafe Mortaza on Taskin Ahmed ) आयपीएल न खेळण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, अर्थातच तस्किनला बक्षीस मिळायला हवे. अँडरसन आणि ब्रॉडकडे बघितलं तर इंग्लंड क्रिकेट बोर्ड काय करतंय. त्यांच्यासाठी कंपनसेशन नसून बक्षीस आहे, जे राष्ट्रीय संघाला आयपीएलपेक्षा प्राधान्या देतात. असे केल्याने खेळाडूंना चांगले वाटते की बोर्ड त्यांचे कल्याण पाहत आहे. तस्किनची मेहनत कामी आली आहे. त्याने कोविडच्या काळात खूप मेहनत केली होती. त्यामुळे आता त्याचे फळ मिळत आहे. मला वाटते की तो आता त्याच्या मुख्य टप्प्यातून जात आहे, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो त्यावर कसा नियंत्रण ठेवतो. तो माघारी आल्यानंतर मीडियामध्ये एक वेगळेच वातावरण असेल आणि चाहत्यांसह सर्वजण त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतील.

सध्या दक्षिण आफ्रिकेत बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( Bangladesh v South Africa ) संघात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ज्यामध्ये बांगलादेश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला. यामध्ये अंतिम सामन्यात तस्किन अहमदने घातक गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. तस्किन अहमद एक दमदार वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला आहे.

हेही वाचा -IPL 2022: एमआयचा युवा खेळाडू टिळक वर्माची कथा का आहे प्रेरणादायी? जाणून घ्या एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details