जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर हे आपल्या कारकिर्दीत अपमानजनक गाणे गाणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी होते. त्यांनी संघातील खेळाडूंसोबत अपमानजनक गाणे गायल्याची कबुली दिली आहे. यासाठी त्यांनी माफी मागितली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, पॉल अॅडम्ससह काही खेळाडूंनी वर्णद्वेषी भेदभावचा आरोप केल्यानंतर मार्क बाऊचर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण समितीला 14 पानाचा माफीनामा पाठवला आहे.
पॉल अॅडम्स याने एसजेएनच्या समोर सुनावणी दरम्यान, दावा केला होता की, मार्क बाऊचर त्या खेळाडूत सामिल होते. ज्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी भेदभाव टिप्पणी करताना अपमानजनक गाणे गायले. यावर मार्क बाऊचर यांनी सांगितलं की, त्यांनी अॅडम्सला कोणतेही टोपणनाव ठेवले नव्हते.
आरोपांवर बाऊचर म्हणाले की, संघातील खेळाडूंपेक्षा स्वत: जास्त संवेदनशील व्हायला हवे होते. मार्क बाऊचर यांनी त्याच्या माफिनाम्यात म्हटलं की, मी कोणत्याही अपमानजनक आचरणाचा, वास्तविक किंवा कथित घटनेसाठी माफी मागतो. ज्यासाठी मला जबाबदार ठरवलं जात आहे.