मुंबई:आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) या स्पर्धेला 16 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर भारताचे काही फलंदाज आपल्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहेत. सीझन 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल होती. पण आयपीएल 2022 मध्ये राहुल ( Opener KL Rahul ) या स्पर्धेतील सर्वोत्तम भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने दहा सामन्यांमध्ये 56.38 च्या सरासरीने आणि 145.01 च्या स्ट्राइक रेटने 451 धावा केल्या, ज्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दोन शतकांचा समावेश आहे.
दुसरीकडे, शर्माने 9 डावात 17.22 च्या सरासरीने आणि 123.01 च्या स्ट्राइक रेटने फक्त 155 धावा केल्या. त्याच वेळी, भारतीय संघात, त्याचा एकदिवसीय सलामीचा जोडीदार शिखर धवन ( Opener Shikhar Dhawan ) पंजाब किंग्जमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने दहा सामन्यांमध्ये 46.13 च्या सरासरीने आणि 124.66 च्या स्ट्राइक रेटने 369 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध ओपनिंग करणारा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन याने दोन अर्धशतकांसह आयपीएल 2022 हंगामाची सुरुवात केली, परंतु त्यानंतरच्या सामन्यांमध्ये तो आपली कामगिरी दाखवू शकला नाही. नऊ सामन्यांमध्ये किशनने 28.13 च्या सरासरीने आणि 111.38 च्या स्ट्राईक रेटने केवळ 225 धावा केल्या आहेत.