हैदराबाद: आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 'मिस्टर आयपीएल' म्हणून परिचित असलेल्या, सुरेश रैनाला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. त्यामुळे सुरेश रैना आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ( Fifteenth season of IPL ) खेळताना दिसणार नाही. या कारणामो सुरेश रैनाचे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होता. परंतु आता सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रैनाची 2022 च्या मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा मालदीवमध्ये एक मोठा सन्मान ( Suresh Raina honored in Maldives ) करण्यात आला आहे. रैनाची 2022 च्या मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड ( Selection as a sports icon ) करण्यात आली आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्यासह फुटबॉल जगतातील आणि ऍथलेटिक्समधील खेळाडूंसह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह रैनाचे नामांकन करण्यात आले होते.
सुरेश रैनाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केलेल्या सर्व कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाच्या माहितीनुसार हा कार्यक्रम 17 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर रैनाने ट्विटरवर आयोजकांचे आभार मानले ( Raina thanked the organizers ) आहेत. रैनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आदरणीय इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि अहमद महलूफ यांचे आभार. जागतिक व्यासपीठावर सर्व जगज्जेत्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. असा अप्रतिम पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन."