लंडन :आयपीएल 2022 ही स्पर्धा सुरु होण्यासाठी आता फक्त तीन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या अगोदर इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला यंदा गुजरात टायटन्स संघाने खरेदी केले होते. त्यानंतर त्याने बायो बबलच्या थकव्यामुळे माघार घेतली होती. आता या खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. त्याच्यावर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई ( England and Wales Cricket Board Action ) केली आहे.
England Cricket Board on Jason Roy: जेसन रॉयवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी कारवाई; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Jason Roy News
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयवर ( Opener Jason Roy ) इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केली. इंग्लंडच्या आचारसंहितेतील 3.3 नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे क्रिकेट शिस्तपालन समितीने ( Cricket Discipline Committee ) जेसन रॉयच्या विरोधात निकाल दिला आहे. त्याचबरोबर जेसन रॉयने आपली चूक मान्य केली आहे.
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयवर ( Batsman Jason Roy ) इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई करताना दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्याचबरोबर या कारवाई बरोबरच त्याला 2500 युरो म्हणजेच जवळपास अडीच लाखांचा दंड देखील सुनावला आहे. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. तसेच जेसन रॉयने खेळाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणारी कृती केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान यानंतर जेसन रॉयच्या वागणूकीत सुधारणा झाली नाही, तर त्याच्यावर घालण्यात आलेली 12 महिन्यांपर्यंत देखील वाढवली जाऊ शकते. कारण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात माहिती देण्यात आली आहे की, क्रिकेट शिस्तपालन समितीने ( Cricket Discipline Committee ) जेसन रॉयच्या विरोधात निकाल दिला होता. त्याच्या वागणूकीमुळे त्याची, क्रिकेट आणि एसीबीची बदनामी झाली. त्याने इंग्लंडच्या आचारसंहितेतील 3.3 नियमाचे उल्लंघन केले आहे.