मुंबई :आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला फक्त 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी यंदा 10 संघांनी कंबर कसली आहे. परंतु आयपीएल 2022 च्या हंगामात सहभागी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स संघाला स्पर्धा सुरु होण्यागोदर मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ( Mark wood Ruled Out of IPL ) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याबाबत आता लखनौ सुपरजायंट्सने ट्विट करत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वेगवान गोलंदाड मार्क वूडला आयपीएलच्या मेगा लिलावात 7.50 कोटीची बोली लावत खरेदी केले होते. इतकी मोठी रक्क्म मिळाल्याने मार्क वूड देखील खुश होता. परंतु इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपराच्या दुखापतीमुळे ( Injury to Mark Wood's corner ) आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. याबाबत लखनौ सुपरजायंट्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.