पुणे - इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 42 वा सामना पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी ( 29एप्रिल ) पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स संघात होणार आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Punjab Kings Have Won Toss ) आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी आठ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांपैकी लखनौ सुपरजायंट्सने ( Lucknow Super Giants Team ) पाच सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यात त्यांना हार पत्कारावी लागली आहे. त्यामुळे या संघाचे 10 गुण असून हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज संघाने आपल्या आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकलेत आणि चार गमवाले आहेत. त्यामुळे या संघाचे 8 गुण असून हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. या सामन्यात पंजाब संघाची धुरा मयंक अग्रवालच्या ( Mayank Agarwal ) आणि लखनौ संघाची धुरा केएल राहुलच्या ( KL Rahul ) खांद्यावर आहे.