मुंबई - भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला निलंबित करणार्या अॅपेक्स काऊन्सिलच्या पाच सदस्यांना तात्पुरते अपात्र ठरवत लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा यांनी रविवारी अझरुद्दीनकडे पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्षपद सोपवले आहे.
ही आहेत त्या पाच सदस्याची नावे -
जॉन मनोज, उपाध्यक्ष आर विजयनंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा ही या पाच सदस्यांची नावे आहेत. अॅपेक्स काऊन्सिलने आपल्या संविधानाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अझरुद्दीनचे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यपदावरून निलंबित केले होते.
अझरुद्दीन यांच्याविरूद्धची तक्रार लोकपालकडे पाठवण्यात आलेली नव्हती. अॅपेक्स कौन्सिल स्वतःहून असे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच अध्यक्षाला निलंबित करण्यासाठी या पाच सदस्यांनी मंजूर केलेला ठराव रद्द करणे योग्य आहे. म्हणूनच मी निर्देश देतो, की मोहम्मद अझरुद्दीन अध्यक्षपदावर राहिले पाहिजेत आणि पदाधिकाऱ्यांविरोधातील सर्व तक्रारी लोकपालच ठरवतील, असे न्यायमूर्ती वर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.