महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs WI 3rd T20I : वेस्ट इंडीजला १७ धावांनी मात देत भारताने टी-२० मालिका जिंकली - India vs West Indies

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिकेतील ( India v West Indies T20 series ) तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने विजयी आघाडी ( India leads the series 2-0 ) घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. तत्पुर्वी भारत आणि वेस्ट इंडिज संघात नाणेफेक झाली आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( West Indies opt to bowl ) घेतला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली.

IND vs WI
IND vs WI

By

Published : Feb 20, 2022, 7:01 PM IST

Updated : Feb 21, 2022, 12:35 AM IST

कोलकाता :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिकेतील ( India v West Indies T20 series ) तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने विजयी आघाडी ( India leads the series 2-0 ) घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. तत्पुर्वी भारत आणि वेस्ट इंडिज संघात नाणेफेक झाली आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( West Indies opt to bowl ) घेतला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने 11 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावून 78 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा फलंदाज रुतुराज गायकवाड (8) स्वस्ता परतला. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इशान किशन 34 आणि श्रेयस अय्यर 25 धावांवर बाद झाले. सध्या रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव खेळत आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून शानदार गोलंदाजी बघायला मिळाली. ज्यामध्ये रॉस्टन चेस, हेडन वॉल्श आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी-20 सामना ( IND v WI 3rd T20I ) ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यासांठी बीसीसीआयने बंगाल क्रिकेट संघटनेला ( Cricket Association Bengal ) 20 हजार प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजचा सामना चाहत्यांच्या उपस्थित पार पडेल. आवेश खानला भुवनेश्वर कुमारकडून टी20 पदार्पणाची कॅप मिळाली आहे.

या सामन्यात भारतीय संघात संघाला सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला क्लिन स्विप देण्याची नामी संधी असणार आहे. या अगोदर ही वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला 3-0 ने क्लिन स्विप दिला होता. आता त्याची पुनरावृती करण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ असणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज हा सामना जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

आजच्या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. भारतीय संघात विराट कोहलीला विश्रांती ( Rest to Virat Kohli ) दिल्याने त्याच्या जागी रुतुराज गायकवाडला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी ( Opportunity for Ruturaj Gaikwad ) मिळाली आहे. रुतुराज गायकवाड आणि आवेश खानला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन -

भारतीय संघ :

रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान

वेस्ट इंडिजचा संघ :

काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श

Last Updated : Feb 21, 2022, 12:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details