कोलकाता : आजपासून (16 फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने सुरुवातीला गोलंदाजी ( India opt to bowl ) घेतली. भारताने विंडीजला 158 रणांवरच थाबवले. या धावांचा पाठलाग करताना हा सामना भारताने 6 गडी राखत जिंकला आहे. त्यमुळे भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ नवीन नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. या मालिकेतून उपकर्णधार केएल राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात उपकर्णधाराची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर असणार आहे. आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाज रवि बिष्णोईने भारतीय संघात पदार्पण केले ( Ravi Bishnoi debu Indian team ) आहे.
आज होणाऱ्या सामन्यात आयपीएल लिलावात महागडे ठरलेल्या खेळाडूंवर सर्वाचे लक्ष असणार आहे. यामध्ये दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former Indian captain Virat Kohli ) सपशेल अपयशी ठरला होता. या मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघतील अशी अपेक्षा सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जशी वनडे मालिका जिंकली, तशी टी-20 मालिका देखील जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.