न्यॉन (स्वित्झर्लंड): ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू लिसा स्थळेकर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोशिएशन (FICA) ची पहिली महिला अध्यक्ष बनली ( Lisa Sthalekar appointed first woman president ) आहे. न्यॉन, स्वित्झर्लंड येथे झालेल्या FICA कार्यकारी समितीच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार, 42 वर्षीय स्थळेकर यांनी या पदावर नियुक्ती निश्चित केली. त्यांच्या आधी दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि अलीकडेच इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी यांनी हे पद भूषवले आहे.
या आठवड्यात निऑन, स्वित्झर्लंड येथे झालेल्या फिका ( Federation of International Cricketers Associations ) कार्यकारी समितीच्या बैठकीत लिसा स्थळेकर यांची FICA अध्यक्ष म्हणून पुष्टी करण्यात आली आहे, असे फिकाने एका निवेदनात म्हटले आहे. कोविड-19 महामारीनंतर फिकाची ही पहिलीच बैठक होती. फिकाचे कार्यकारी अध्यक्ष हेथर मिल्स ( Executive chairman of FICA Heather Mills ) म्हणाले, "आमच्या सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, आमच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून लिसा यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे."