विशाखापट्टणम:भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना मंगळवारी पार पडला. हा सामना भारतीय संघाने 48 धावांनी जिंकला. या विजयात रुतुराज गायकवाडचे योगदान महत्वाचे होते. सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Opener Ruturaj Gaikwad ) इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु राष्ट्रीय संघाच्या कामगिरीमध्ये तो फॉर्म रुपांतरित करु शकला नव्हता. पण त्याला त्याची फारशी चिंता नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूने आतापर्यंत 36 आयपीएल सामन्यांमध्ये 1207 धावा केल्या आहेत, परंतु 25 वर्षीय खेळाडूने मंगळवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पहिले आंततरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. त्याने 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 120 धावा केल्या आहेत.
'... हा खेळाचा भाग आहे' -
त्याचा नाराज झाला का, असे विचारले असता गायकवाड म्हणाला, "नाही, मी नाराज नाही, हा खेळाचा भाग आहे." तो म्हणाला, 'गेले वर्ष माझ्यासाठी खूप चांगले होते. त्यामुळे लोकांना खूप अपेक्षा होत्या. कारण जेव्हा तुमची आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी असते तेव्हा असे घडते.'
यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या फॉर्ममध्ये चढ-उतार आले असले तरी, त्याने अखेरीस पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) 14 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 368 धावा केल्या. तो म्हणाला, 'आयपीएलमधली विकेट थोडी बॉलर फ्रेंडली होती. एकही सपाट विकेट नव्हती, चेंडू वळत होता आणि त्यात काहीसा स्विंग होता. गायकवाड म्हणाला, 'म्हणजे आयपीएलमधील तीन-चार सामन्यांमध्ये मी काही चांगल्या चेंडूंवर आऊट झालो, काही चांगले शॉट्स क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले, पण हा सगळा T20 क्रिकेटचा भाग आहे.'