ओमान: लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) या स्पर्धेचा अंतिम सामना काल पार पडला. हा सामना वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायंन्स (World Giants vs Asia Lions) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाने 25 धावांनी आशिया लायन्स संघाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 256 अशी धावसंख्या उभारली होती. या बदल्यात आशिया लायन्स 8 बाद 231 धावाच करु शकला. त्यामुळे आशिया लायन्स संघाला आपल्या पहिल्या विजेतेपदापासून दूर रहावे लागले.
या अंतिम सामन्यात कोरी एंडरसनने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार (Corey Anderson Player of the Match) पटकावला. तसेच स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड या पुरस्कारावर मोर्ने मोर्कल आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात केविन पीटरसनने आपल्या वर्ल्ड जायंट्स संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी साकारली. त्यानंतर तो बाद झाला. मात्र तरी देखील या संघाने धावांची गती कमी होऊ दिली नाही.
कोरी एंडरसनने आपली दमदार फटकोबाजी सुरुच ठेवली. त्याने 43 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकार लगावत नाबाद 94 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याला ब्रॅड हॅडिन (16 चेंडूत 37 धावा, 2 चौकार आणि 4 षटकार), डॅरेन सॅमी (17 चेंडूत 38 धावा, 2 चौकार आणि 4 षटकार) आणि एल्बी मॉर्केल (8 चेंडूत 17*, एक चौकार आणि एक षटकार) यांचा फटका बसला. या कारणास्तव त्यांना 20 षटकांत 256-5 धावा केल्या. आशिया लायन्सकडून नुवान कुलसेकराने 3 (Nuwan Kulasekara took 3 wickets), चामिंडा वास आणि मुथय्या मुरलीधरनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
आशिया लायन्स संघाला (Asia Lions Team) 257 धावांच्या लक्ष्य मिळाले होते. या संघाची सुरुवात चांगली झाली. बऱ्यापैकी खेळाडूंना चांगली सुरुवात करता आली. परंतु या खेळाडूंना आपल्या खेळीचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. संघाचे खेळाडू ठराविक काळाने बाद होत राहिले. आशिया लायन्स संघासाठी मोहम्मद युसुफने 21 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. त्याचबरोबर सनथ जयसुर्याने 23 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या दोघांनीच आशिया लायन्स संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे या संघाला 20 षटकात 8 बाद 231 धावाच करता आल्या. वर्ल्ड जायंट्स संघाकडून एल्बी मोर्कलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर माँटी पानेसरने 2, केविन पीटरसन,रयान साइडबॉटम आणि मोर्ने मोर्कल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा:In Dv Wi T20 Series : भारता विरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडीजचा 16 सदस्यीय संघ जाहीर