ओमान:लिजेंडस लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेतील काल सहावा सामना इंडिया महाराजास आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाने इंडिया महाराजा संघाचा पाच धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे इंडिया महाराजा संघ फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला आहे. वर्ल्ड जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 228 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंडिया महाराजा संघाला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु इंडिया महाराजा संघ प्रत्युतरात 7 बाद 223 धावाच करु शकला. त्यामुळे इंडिया महाराजा संघाचा 5 धावांनी पराभव झाला.
या सामन्यात इंडिया महाराजासने ( India Maharajas Team) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सामन्याच्या दुसऱयाच षटकात केविन पीटरसनला (11) धावांवर बाद केले. त्यानंतर हर्षस गिब्सने पहिल्यांदा फिल मस्टर्ड सोबत 98 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केविन ओ'ब्रायन सोबत 71 धावांची भागीदारी केली. त्यामुळे हा संघ एक मजबूत धावसंख्या उभारु शकला. हर्षस गिब्सचे शतक हुकले मात्र त्याने 46 चेंडूत शानदार 86 धावांची खेळी साकारली. तसेच केविन ओ'ब्रायनने 34 धावांचे योगदान दिले.
शेवटी एल्बी मोर्केलन आणि जॉंटी रोड्स यांनी अनुक्रमे 16 आणि 20 धावांचे योगदान दिले. त्यामुळे वर्ल्ड जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 228 धावा केल्या. इंडिया महाराजासकडून मुनाफ पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोब रजत भाटिया आणि इरफान पठान यांनी एक-एक विकेट घेतली.
229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंडिया महाराजासची सुरुवात खराब झाली (India Maharajas got off bad start). वसीम जाफर (4) आणि एस बद्रीनाथ (2) या दोन विकेट्स संघांनी लवकर गमावल्या. त्यानंतर नमन ओझा आणि यूसुफ पठान यांनी आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये तब्बल 103 धावांची भागीदारी झाली. यानंतर यूसुफ पठान हा 22 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. त्याचबरोबर नमन ओझाने 51 चेंडूत 95 धावांची दमदार खेळी केली. परंतु फक्त 5 धावांनी त्याचे शतक हुकले. त्यानंतर इंडिया महाराजासचा संघ अडचणीत दिसून आला.
दरम्यान इरफान पठान संघाचे सूत्र आपल्या हाती घेत शानदार खेळी केली. ज्यामध्ये त्याने फक्त 21 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये त्याने एक विक्रम आपल्या नावे केला. त्याने या हंगामातील वेगवान शतक ठोकण्याचा माान मिळवला. त्याच्या या खेळीमुळे इंडिया महाराजासचा संघ विजयाच्या जवळ आला होता. तसेच संघाला शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती. त्यावेळी ब्रेटलीने या षटकात इरफान पठानला बाद करत फक्त दोन धावा दिल्या. इंडिया महाराजास संघाचा पराभव झाला (India Maharajas were defeated). इंडिया महाराजा संघ प्रत्युतरात 7 बाद 223 धावाच करु शकला. वर्ल्ड जायंट्सकडून रयान साइडबॉटम आणि मोर्ने मोर्केलने 2-2 विकेट घेतल्या, ब्रेट ली आणि एल्बी मोर्केल यांना एक विकेट मिळाली.