नवी दिल्ली: ग्लोबल टी20 लीग लिजेंड्स लीग क्रिकेटने शनिवारी ओमानमधून दुसऱ्या सत्राचे भारतात हस्तांतरण करण्याची घोषणा ( legends league cricket shifted to india ) केली. "क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांचा भारतातील मोठा चाहता वर्ग आणि भारताकडून पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन, एलएलसीने सप्टेंबर 2022 मध्ये आगामी हंगामासाठी तळ भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे," असे एका निवेदनात म्हटले आहे.
या स्पर्धेत इयान बटलर (न्यूझीलंड), मिचेल मॅकक्लेनाघन (न्यूझीलंड), एल्टन चिगुम्बुरा (झिम्बाब्वे), धम्मिका प्रसाद (श्रीलंका), पारस खडका (नेपाळ), चामिंडा वास (श्रीलंका) क्रिस्टोफर मपोफू (श्रीलंका) आणि लक्ष्मी रतन शुक्ला (भारत) सारखे प्रतिष्ठित खेळाडू लेजेंड्स लीगमध्ये क्रिकेट खेळताना ( Legends League cricket adds mcclenaghan vaas ) दिसतील. गेल्या आठवड्यात, त्यात डेल स्टेन, जॅक कॅलिस, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मुरलीधरन, मॉन्टी पानेसर, प्रवीण तांबे, नमन ओझा, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी आणि असगर अफगाण यांसारख्या दिग्गजांची भर पडली होती.