फ्लोरिडा -भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचे दोन टी20 सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहेत. दोन्ही संघांना अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकबझने सांगितल्यानुसार, गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांनी केलेल्या हस्तक्षेपानंरत काही खेळाडू, सपोर्ट स्टाफसाठी यूएसए व्हिसा मिळाला आहे. त्यामुळे आज भारतीय संघ फ्लोरिडामध्ये दाखल होणार ( india west indies will be held in florida ) आहे.
भारतीय संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना अमेरिकन व्हिसा मिळत नव्हता. त्याच पार्श्वभूमीवर भारीय संघातील काही सदस्य गयानातील गयानातील जॉर्ज टाऊनमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासात गेले. तेव्हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होते. तर, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंना फ्लोरिडाला जाण्यासाठी यापूर्वी परवनागी मिळाली होती.