महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यॉर्कर स्पेशालिस्ट लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घोषणा केली. मलिंगाने याआधीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली होती. त्याने आता टी-20 मधून निवृत्तीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

Lasith Malinga announces retirement from all forms of cricket
यॉर्कर स्पेशालिस्ट लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

By

Published : Sep 14, 2021, 7:23 PM IST

कोलंबो - टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी घेणारा श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घोषणा केली. मलिंगाने याआधीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली होती. त्याने आता टी-20 मधून निवृत्तीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

मलिंगाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले विकेट पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला त्याला कॅप्शन दिले आहे की, खेळाप्रती माझे प्रेम कधी कमी होणार नाही.

मागील 17 वर्षात मी जो अनुभव मिळवला. आता मैदानात त्याची गरज नाही. कारण मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पण मी युवा खेळाडूंना समर्थन आणि मार्गदर्शन करत राहिन, असे देखील लसिथ मलिंगाने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा हॅट्ट्रिक विकेट घेणारा लसिथ मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 107 गडी बाद केले आहेत. 37 वर्षीय लसिथ मलिंगाच्या नावे आयपीएलमध्ये 170 विकेट आहेत. त्याने आपला अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना याच वर्षी मार्च महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता.

हेही वाचा -IPL 2022 : दोन नव्या संघासाठी 17 ऑक्टोबरला ऑक्शन, जाणून घ्या खेळाडूंचा लिलाव कधी होणार

हेही वाचा -IPL 2021 : होय, आमची त्यावेळी भीतीने गाळण उडाली होती, KKR चे कोच ब्रँडन मॅक्युलमची कबुली

ABOUT THE AUTHOR

...view details