नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) आठवा हंगाम शनिवारी संपला. अंतिम सामन्यात लाहोर कलंदरचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने तुफानी खेळी केली. आफ्रिदीने 15 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकार लगावत 44 धावा केल्या. आफ्रिदीने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. शाहीनने 51 धावांत 4 बळी घेतले.
कलंदर संघाची प्रथम फलंदाजी : लाहोर कलंदर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. कलंदर्सकडून अब्दुल्ला शफीकने सर्वाधिक ६५ धावा केल्या. कलंदर्सच्या 200 धावांच्या प्रत्युत्तरात मुलतानला आठ गडी गमावून 199 धावाच करता आल्या. मुलतानकडून रिले रोसोने 52 धावांची सर्वाधिक खेळी केली. रोसोने आपल्या खेळीत 32 चेंडूंचा सामना केला. रिलेने या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार लगावले. तर मोहम्मद रिझवानने 34 धावांची खेळी करत उत्तम साथ दिली.
विजेत्याला 12 कोटींचे बक्षीस : पीएसएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या लाहोर कलंदरला 12 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. दुसरीकडे उपविजेत्या मुलतान सुलतानला 4.80 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अंतिम सामन्यातील शानदार कामगिरीसाठी शाहीन आफ्रिदीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोहम्मद रिझवानला बॅट्समन ऑफ द टूर्नामेंटचा किताब देण्यात आला. इहसानुल्लाला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले.
गोलंदाजाला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार : वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला. इमाद वसीमला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मोहम्मद रिझवानची स्पर्धेतील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली. अब्बास आफ्रिदीला इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. पेशावर झल्मी संघाला स्पिरिट ऑफ क्रिकेटचा पुरस्कार देण्यात आला. पीएसएलच्या इतिहासात प्रथमच एका गोलंदाजाला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला. इहसानुल्लाला याला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हा पुरस्कार मिळाला.
हे ही वाचा :Ind Vs Aus 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, जाणून घ्या हवामानाची स्थिती