मँचेस्टर : ऋषभ पंतच्या मास्टरक्लास आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू ( All-rounder Hardik Pandya ) कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले ( Virat Kohli praises pant and pandya ) आहे. भारतीय संघाने रविवारी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-1 असा विजय नोंदवला. एका वेळी भारतीय संघ 38 धावांवर होता, जिथे त्यांनी त्यांच्या तीन प्रमुख खेळाडूंच्या विकेट गमावल्या होत्या. ज्यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन आणि कोहली यांच्या विकेट्सचा समावेश होता.
तीन प्रमुख खेळाडूंच्या विकेट्स गमावल्यानंतर, संघाच्या इतर फलंदाजांनी सर्वोत्तम खेळी खेळली, जिथे पंड्याने पंतसह 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली. तसेच स्वतः 55 चेंडूत 71 धावा आणि गोलंदाजी करताना 4 विकेट्ल घेतल्या. कोहलीने कु अॅपवर पोस्ट करताना ( Kohli post on Ku App after win ) टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करताना कॅप्शनमध्ये लिहिले, शानदार धावांचा पाठलाग आणि शानदार मालिका. त्याचवेळी मोहम्मद शमीनेही तिसऱ्या वनडेतील विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. कु अॅपवर शमी म्हणाला, संघाचे अभिनंदन.