बंगळुरू: भारताचा सलामीवीर केएल राहुलला ( Indian opener KL Rahul ) 21 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. तो अद्याप पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही, त्यामुळे राहुल 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 ( IND vs WI T-20 Series ) मालिकेतून बाहेर पडू शकतो. रोहित शर्मा, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक यांसारख्या खेळाडूंसह त्रिनिदादचा एक व्हिडिओ बीसीसीआयने 26 जुलै रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर युजर्सनी राहुल कुठे? असा प्रश्न केला होता.
परंतु ईएसपीएन क्रिकइन्फो मधील एका अहवालात असे म्हटले आहे की, राहुल जूनच्या अखेरीस दुखापतीच्या शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेल्यानंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बरा होत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकल्यानंतर तो आता ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेसाठी उपलब्ध ( Rahul available for ODI against Zimbabwe ) असेल. अहवालात म्हटले आहे की, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती, मात्र यादरम्यान त्याने दोन नकारात्मक अहवाल दिले आहेत. मात्र आता वेस्ट इंडिज दौऱ्याऐवजी तो वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग असलेल्या झिम्बाब्वेमधील वनडे मालिकेवर लक्ष केंद्रित करेल.